4 प्रकारात गाडी लाँच, 6.29 लाखापासून किंमत सुरु
वृत्तसंस्था/ चेन्नई
रेनॉ इंडिया यांनी आपली लोकप्रिय सात सीटरची एमपीव्ही ट्रिबर कार नुकतीच बाजारात लॉन्च केली आहे. रेनॉ रीथिंग या घोषवाक्यासह नव्या डिझाईन आणि अनेकविध वैशिष्ट्यांसह गाडीची सुधारित आवृत्ती कंपनीने भारतात सादर केली आहे.
या असतील सुविधा
रेनॉ ट्रिबर ही आधीच्या तुलनेमध्ये अधिक आकर्षक रचनेत आली आहे. फ्रंटमध्ये नवे ग्रील, स्कल्प्टेड बोनेट आणि एलईडी प्रोजेक्टर हेडलॅम्प यासह इंटिग्रेटेड डीआरएलएस सेवेसह देण्यात आले आहे. मागच्या बाजूला एलईडी टेललॅम्प, बंपर आणि स्कीडप्लेट देण्यात आलेली असून केबिनमध्ये ड्यूल टोन डॅशबोर्ड, आठ इंचाचा फ्लोटिंग टच क्रीन, अॅम्बीयंट लाइटिंग, डिजिटल इन्स्ट्रुमेंट क्लस्टर, ऑटो हेडलॅम्प, रेन सेंसिंग वायपर तसेच क्रूझ कंट्रोल यासारखी वैशिष्ट्यो या गाडीमध्ये देण्यात आली आहेत.
6 एअरबॅग्जसह 21 सुरक्षा वैशिष्ट्यो
या गाडीत पाच, सहा किंवा सात जणांना बसण्याची सोय करण्यात आलेली आहे. या गाडीत प्रवाशांच्या सुरक्षेसाठी सहा एअरबॅग्ज देण्यात आल्या असून 21 सुरक्षेची वैशिष्ट्योदेखील समाविष्ट करण्यात आली आहेत. फ्रंट पार्किंग सेन्सर्स हे पहिल्यांदाच या गाडीमध्ये देण्यात आलेले आहे. ऑथेंटिक, इवोल्युशन, टेक्नो आणि इमोशन या चार प्रकारांमध्ये ही गाडी सादर करण्यात आली असून गाडीची सुरुवातीची एक्स शोरूम किंमत 6.29 लाखपासून सुरु होऊन 9.16 लाख रुपयांपर्यंत असणार आहे.









