5,300 कोटी रुपयांची गुंतवणूक : जागतिक बाजारासाठी सहा कार्सची करणार निर्मिती
नवी दिल्ली
फ्रान्सच्या रेनॉ आणि जपानच्या निस्सान या कार उत्पादक कंपन्यांनी भारतीय बाजारपेठेसाठी त्यांच्या भविष्यातील योजना जाहीर केल्या आहेत. या दोन कंपन्या मिळून भारत आणि जागतिक बाजारपेठेसाठी 6 नवीन कार तयार करुन त्याची विक्री करणार आहेत. 6 कार मॉडेलपैकी, तीन एकत्रित प्लॅटफॉर्मवर विकसित करण्यात येणार आहेत. यामध्ये 2 नवीन पूर्णपणे इलेक्ट्रिक वाहने आणि 4 एसयूव्हीचा समावेश राहणार असल्याची माहिती आहे.
पुढील 15 वर्षांत वाहन कंपन्या भारतीय बाजारपेठेत त्यांच्या नवीन प्रकल्पांसाठी 5,300 कोटी रुपयांची गुंतवणूक करणार आहेत. रेनॉ-निस्सान ऑटोमेटिव्ह इंडिया यांनी यासाठी तामिळनाडू सरकारसोबत करार केला आहे. यामुळे आर व डीमध्ये आगामी काळात 2,000 रोजगाराच्या संधी निर्माण होतील, अशी रेनॉ-निस्सानची अपेक्षा आहे.
कार्बनमुक्त करणार कारखाना
दोन्ही कंपन्या सध्या चेन्नईपासून 45 किमी अंतरावर असलेल्या ओरागडम येथील त्यांच्या कारखान्यात चार मॉडेल्स तयार करतात. रेनॉ-निस्सानचा उत्पादन कारखाना 2045 पर्यंत कार्बनमुक्त होईल. येथे केवळ अक्षय ऊर्जा वापरली जाणार असल्याचेही स्पष्ट केले आहे.
-निस्सान सीओओ अश्विनी गुप्ता









