नवी दिल्ली
जपानमधील चिप निर्मिती कंपनी रेनासस इलेक्ट्रॉनिक्स कॉर्प यांनी भारतातील टाटा मोटर्ससोबत भागीदारी करण्याचा निर्णय घेतला आहे. सेमिकंडक्टर विकासासाठी व धोरणात्मक तरतुदींसाठी ही भागीदारी आगामी काळात महत्त्वाची ठरणार आहे.अलीकडच्या काळामध्ये सेमिकंडक्टरचा तुटवडा जगभरातील देशांसह भारतालाही सतावत होता. आता ही उणीव रेनासस व टाटा मोटर्स यांच्या भागीदारीमुळे भरून काढली जाणार आहे.









