प्रतिनिधी / पेडणे
पेडणे तालुक्मयातील राष्ट्रीय महामार्ग 66 वरील तोरसे जंक्शन जवळील सरकारी हायस्कूल इमारत आहे आणि या इमारती च्या परिसरात जो पूर्वीचा जोड रस्ता होता. तो जोड रस्ता बंद करून सरकारने अजून त्या ठिकाणी नवीन रस्ता केलेल्या नाही. तो नवीन रस्ता आणि गेल्या महिन्यात राष्ट्रीय महामार्ग तोरसे जंक्शनवर आई बाळासहित मृत्यूची घटना घडली होती. तो रस्ता अजूनही तसाच ठेवलेला आहे. हे दोन्ही रस्ते त्वरित व्यवस्थित करावे, आणि हायस्कूल साठी सुरक्षा भिंत जी पूर्वी रस्त्याला टेकूनच होती, त्या पद्धतीने ती तशी भिंत उभारावी, आणि रस्ता दुरुस्ती करावा जर दुरुस्ती केली नाही तर यापुढे तीव्र आंदोलन छेडण्याचा इशारा तोरसे सरकारी हायस्कूलच्या पालक शिक्षक संघटनेच्या पदाधिकाऱयांनी शनिवारी 19 रोजी यावेळी दिला.
सरकारचे लक्ष वेधण्यासाठी 19 रोजी सरकारी हायस्कूलच्या पालक शिक्षक संघाच्या सर्व सदस्यांनी राष्ट्रीय महामार्ग परिसरात एकत्र जमून लाक्षणीक आंदोलन केले. यावेळी जर याठिकणचा रस्ता व जोड रस्ता व्यवस्थित न केल्यास यापुढे हजारो नागरिकांना घेऊन आंदोलन छेडण्याचा इशारा सरपंच प्रार्थना मोटे, माजी सरपंच सूर्यकांत तोरस्कर, संजय महाले आदींसह स्थानिक पालक शिक्षक संघाचे सदस्य उमेश गाड, माजी सरपंच बबन डिसोझा यांनी यावेळी दिला.
ड़ माजी सरपंच सूर्यकांत तोरस्कर यांनी यावेळी बोलताना सांगितले की
पूर्वी या हायस्कूल कडे जाणारा जो जोड रस्ता होता. तो जोड रस्ता राष्ट्रीय महामार्गाचे रुंदीकरणाचे काम करत असताना तो बंद करण्यात आला आणि हायस्कूलचा जोड रस्ता बंद झालेला आहे. तो रस्ता त्वरित खुला करून त्या ठिकाणी डांबरीकरण करण्याची मागणी अनेकवेळा केली. परंतु संबंधित कंत्राटदाराने अद्याप दखल न घेतल्यामुळे आम्हाला रस्त्यावर यावे लागेल, असा इशार माजी सरपंच सूर्यकांत तोरस्कर यांनी दिला.
तोरसे सरपंच प्रार्थना मोटे यांनी कंत्राटदार मनमानी पद्धतीने काम करत असल्याचा आरोप केला. या ठिकाणी अनेकवेळी अपघात होऊन काहींचे बळी गेले आहेत. तरीही हा रस्ता रस्त्याची व्यवस्थितपणे दुरुस्ती केली जात नाही. हायस्कूल जवळ संरक्षक भिंत व रस्ता दुरुस्तीकरण व हॉटमिक्स डांबरीकरण करावे, अन्यथा तीव्र आंदोलन छेडावे लागेल, असा इशारा यावेळी त्यांनी दिला.
सरकारी हायस्कूलसाठी जोडरस्ता त्वरित पूर्ण न केल्यास हजारो पालकांसह रस्त्यावर येऊन आंदोलन करणार, असा इशाराही उमेश गाड यांनी यावेळी दिला. उपाध्यक्ष स्मिता मावळणकर यांनी सरकारने याप्रकरणी त्वरीत लक्ष घालून विद्यार्थ्यांना होणारी समस्या, सोडवावी अशी मागणी केली.
यावेळी पालक संजय महाले, जया सावळ, निकिता सावळ यांनी सरकारनेच्या हलगर्जीपणाबद्दल तीव्र नाराजी व्यक्त केली. सरकारने तातडीने या रस्त्याच्या कामात लक्ष न घातल्यास आंदोलन छेडणारण् असा इशारा दिला.









