बेळगाव : टिळकवाडी, पहिल्या रेल्वेगेटजवळील बॅरिकेड्स सर्वांसाठी डेकेदुखी ठरले आहेत. बॅरिकेड्समुळे अनेक लोकांना त्याचा त्रास होत आहे. तेव्हा याबाबत आपण लक्ष घालावे व बॅरिकेड्सची समस्या दूर करावी, अशा मागणीचे निवेदन सुभाष घोलप यांनी मंत्री लक्ष्मी हेब्बाळकर यांना दिले.
बांधकाम व्यावसायिक अनंत पाटील यांनी सदर बॅरिकेड्स काढून येथे वाहतूक पोलीस नेमावेत व सिग्नल सुरू करावे तसेच काँग्रेस विहिरीजवळून पै इमारतीकडून पूर्वीची वाट सुरू करावी. अशी मागणी केली. यावेळी टिळकवाडी परिसरातील अनेक नागरिक उपस्थित होते. लक्ष्मी हेब्बाळकर यांनी आपण पालकमंत्री सतीश जारकीहोळी यांच्याकडे ही फाईल सुपूर्द करू, असे सांगितले.









