पोलीस महासंचालकांकडे मागणी
बेळगाव : टिळकवाडी येथील पहिले रेल्वे गेट परिसरातील बॅरिकेड्स हटवावे, या मागणीसाठी राज्याच्या पोलीस महासंचालकांना निवेदन देण्यात आले. पोलीस महासंचालक डॉ. एम. ए. सलीम हे मंगळवारी बेळगावमध्ये आले असताना त्यांच्याकडे या मागणीचे निवेदन देण्यात आले. पहिले रेल्वेगेट येथे बॅरिकेड्स लावण्यात आल्याने नागरिकांना ये-जा करणे गैरसोयीचे होत आहे. टिळकवाडीच्या एका भागातून दुसऱ्या भागात जाण्यासाठी अर्धा किलो मीटरचा उलटा प्रवास करावा लागत असल्याने नाराजी व्यक्त होत आहे. त्यामुळे मागील 11 वर्षांपासून घालण्यात आलेले बॅरिकेड्स हटवावेत, अशी मागणी निवेदनाद्वारे करण्यात आली. यावेळी सुभाष घोलप, अजित नाईक, सुमंथ धारेश्वर, मनोहर रोकडे, दीपक गवंडळकर, रमेश फाटक, श्रीकांत कदम, एम. डी. हुगार, रणजित हावळण्णाचे यासह इतर उपस्थित होते.









