स्थानिकांची मागणी : मालमत्तेचे नुकसान, वनखात्याचे दुर्लक्ष
बेळगाव : भाग्यनगर सहावा क्रॉस येथे घरासमोर असलेले धोकादायक वृक्ष आणि फांद्या हटवाव्यात, अशी मागणी स्थानिक रहिवाशांनी केली आहे. याबाबतचे निवेदन वनखाते आणि महानगरपालिकेला देण्यात आले आहे. मात्र अद्याप वृक्ष हटविण्याकडे दुर्लक्ष झाल्याने स्थानिकांच्या मालमत्तेचे नुकसान होऊ लागले आहे. त्यामुळे तातडीने येथील धोकादायक वृक्ष आणि फांद्या हटवाव्यात, अशी मागणी केली आहे. भाग्यनगर परिसरातील हे वृक्ष आणि त्यांच्या फांद्या स्थानिकांना धोकादायक ठरू लागल्या आहेत. वादळी पावसात वाहनांवर फांद्या कोसळून नुकसान झाले आहे. रविवारी पुन्हा वृक्ष कोसळून चारचाकी वाहनांचे नुकसान झाले आहे. त्यामुळे हे वृक्ष आणि फांद्या स्थानिकांना त्रासदायक ठरू लागल्या आहेत. वादळी पाऊस आणि वारा अधूनमधून होत आहे. त्यामुळे स्थानिकांचे मोठे नुकसान होत आहे. घर, वाहने, भिंती, कंपाऊंड आणि इतर घरातील साहित्याचे नुकसान होत आहे. या जुनाट वृक्षांमुळे रस्त्यावर खेळणाऱ्या लहान मुलांच्या जीवालाही धोका निर्माण होऊ लागला आहे. याबाबत निवेदन देऊनदेखील वनखाते उदासीन असल्याचे दिसत आहे.









