प्रतिनिधी /मोरजी
मांदे पंचायत क्षेत्रातील मधलामाज मांदे पुलाजवळील गणेश विसर्जन स्थळावरील वटवृक्षाचा अर्धा भाग कोसळल्याने परिसरात अडचण निर्माण झाली आहे. ते झाड पडले ते दूर करावे, अशी मागणी स्थानिकांनी केली आहे.
19 रोजी रात्री दहा वाजता अचानक गणेश विसर्जन ठिकाणी शेकडो वर्षांपूर्वीच वटवृक्षाचा असलेल्या झाडाचा अर्धा भाग कोसळला. याविषयी स्थानिकांनी अग्निशामक दलाला आणि स्थानिक पंचायतीलाही कळविले. परंतु, आजपर्यंत याची कोणीच दखल न घेतल्याने नाराजी व्यक्त केली जात आहे.
याठिकाणी मांदे पंचायत क्षेत्र परिसरातील शेकडो गणेशमूर्तींचे विसर्जन या ठिकाणी केले जाते. सध्या वटवृक्षाचा अर्धा भाग कोसळल्याने पूर्ण हे स्थळ व्यापला असल्याने अडचण निर्माण झाली आहे. याची दखल पंचायतीने घेऊन हे झाड हटवावे, अशी मागणी स्थानिकांनी केली.









