सत्तेवर आल्यानंतर किंवा सत्तेच्या बाहेर असतानाही पक्षाने जी कामे केली आहेत, त्यांचे स्मरण मतदारांना राहील अशी व्यवस्था करण्यातही भारतीय जनता पक्ष आघाडीवर आहे. सरकारी योजनांच्या लाभार्थ्यांपर्यंत पोहचणे, त्यांच्या संपर्कात राहून त्यांना सरकारच्या कामाची जाणीव करुन देणे ही कामे हा पक्ष यथायोग्यरित्या करतो, असे त्याच्यासंदर्भात बोलले जाते. त्यामुळे हे मतदार पक्षाशी बांधले जातात. गेल्या 10 वर्षांमध्ये या कार्यशैलीत पक्ष निपुण झाला आहे, हे विविध माध्यमांवरील चर्चा कार्यक्रमांमधूनही स्पष्ट होताना दिसत असते.









