भाजप शिष्टमंडळासह ग्रामस्थांची पालकमंत्र्यांकडे मागणी
कुडाळ – प्रतिनिधी
सरंबळ – देऊळवाडी व नेरूर – कांडरी वाडी येथील खचत असलेल्या डोंगराच्या ठिकाणी कायमस्वरूपी उपाययोजना करण्यासाठी निधी उपलब्ध करावा.तसेच नेरुर कन्याशाळा येथील मोरीचे नुतनीकरण करण्यात यावे,अशा मागण्या भाजप शिष्टमंडळासह ग्रामस्थांनी पालकमंत्री रवींद्र चव्हाण यांच्यासह जिल्हाधिकारी व बांधकाम अधिकाऱ्यांकडे बुधवारी निवेदनाद्वारे केली. सरंबळ – देऊळवाडी येथील डोंगर पावसाळ्यात गेली अनेक वर्षे खचत आहे.सदर माती रस्त्यावर येऊन वाहतूक ठप्प होते. या रस्त्यावरून ग्रामस्थांची ये – जा सुरू असते.तर पायथ्याशी असलेल्या धोका आहे नेरूर – कांडरी वाडी येथेही डोंगर खचत असून तेथील लोकवस्तीला धोका निर्माण होऊ शकतो.या दोन्ही ठिकाणी जिल्हा परिषद माजी उपाध्यक्ष रणजित देसाई यांनी काल पाहणी करून सदर गंभीर प्रश्नावर कायम स्वरुपी उपाययोजना करण्यासाठी पालकमंत्री ,जिल्हाधिकारी तसेच संबधित बांधकाम अधिकाऱ्यांची भेट घेण्याचे आश्वासन ग्रामस्थांना दिले होते. त्यानुसार श्री देसाई यांच्या नेतृत्वाखाली भाजपच्या शिष्टमंडळाने व ग्रामस्थांनी आज पालकमंत्री रवींद्र चव्हाण,जिल्हाधिकारी के मंजूलक्ष्मी, जिल्हा परिषद बांधकाम विभाग कार्यकारी अभियंता श्री आवटी यांची भेट घेतली.कुडाळ नेरुर – वालावल – चेंदवण कवठी रस्त्यावरील नेरुर कन्याशाळा येथील मोरी नुतनीकरण करण्यात याव,अशी मागणीही त्याच्याकडे करण्यात आली.भाजपचे जिल्हाध्यक्ष प्रभाकर सावंत, माजी आमदार राजन , कुडाळ मंडळ अध्यक्ष संजय वेंगुर्लेकर, ओरोस मंडळ अध्यक्ष दादा साईल, महिला आघाडी जिखाधक्षा संध्या तेर्से, जिल्हा चिटणीस बंड्या सावंत, पंचायत समिती माजी सदस्य संदेश नाईक, युवा मोर्चा तालुकाध्यक्ष रुपेश कानडे , पप्या तवटे, सरंबळ सरपंच रावजी कदम, उपसरपंच सागर परब, अमोल कदम, माजी सरपंच अजय कदम, सुशील कदम , बालाजी कदम, श्रावण जाधव, ग्रामपंचायत सदस्य महेश सरंबळकर , बंटी गोसावी व ग्रामस्थ उपस्थित होते. पालकमंत्री श्री चव्हाण यानी जिल्हाधिकारी, सार्वजनिक बांधकाम विभाग व जिल्हा परिषद बांधकाम विभागाला तातडीने कार्यवाही करण्याबाबत आदेश दिले. सरंबळ देऊळवाडी येथील खचलेल्या डोंगराची माती रस्त्यावर आली आहे. ती तातडीने जेसीबीने बाजूला करून मार्ग मोकळा करून त्या ठिकाणी गटार मारण्याचे काम 27 जुलै रोजी सकाळी सुरू करण्यात येईल. तसेच नियोजन समितीच्या आराखड्यांमधून डोंगर खचत असलेल्या त्या ठिकाणी संरक्षक भिंतीच्या कामाला निधि मंजूर करण्याची ग्वाही पालकमंत्री श्री चव्हाण यांनी दिली.









