माजी आमदार अरुण शहापूर यांची सोसायटीला सदिच्छा भेट
येळ्ळूर : ‘नवहिंद सोसायटी’ने आर्थिक आणि शैक्षणिक क्षेत्रात उल्लेखनीय कार्य करून सर्वसामान्यांचा विश्वास संपादन केला आहे. आपल्या कार्याची सुरुवात तळागाळातील लोकांपर्यंत पोहोचविल्यामुळेच आर्थिक क्षेत्रात सोसायटीने भरारी घेतली आहे, असे प्रतिपादन शिक्षक मतदारसंघाचे माजी आमदार अरुण शहापूर यांनी नवहिंदच्या वडगाव येथील कार्पोरेट ऑफिसच्या सदिच्छा भेटीप्रसंगी केले. प्रारंभी चेअरमन प्रकाश अष्टेकर यांनी सोसायटीच्या व संघटनेच्या क्रीडा, शैक्षणिक आणि आर्थिक क्षेत्रातील कामगिरीबद्दल माहिती दिली. मराठी मॉडेल स्कूलच्या फळ्यांची दुऊस्ती केली. त्यानंतर कामगारांसाठी सुरुवातीच्या काळात 900 सायकलींचे वितरण कर्ज स्वरुपात करण्यात आले. याप्रसंगी नवहिंद क्रीडा केंद्राचे क्रीडा प्रमुख वाय. सी. गोरल आणि रिकव्हरी प्रमुख जे. एस. नांदुरकर यांचीही भाषणे झाली. यावेळी संचालक संभाजी कणबरकर, साहाय्यक व्यवस्थापक नारायण वेर्णेकर, मुख्य कार्यालयाचे व्यवस्थापक विवेक मोहिते, बेळगाव जिल्हा शारीरिक शिक्षक संघाचे कार्यदर्शी उमेश कुलकर्णी, आर. पी. वंटगुडी, तारिहाळकर आदी उपस्थित होते.









