5 हजार वर्षे जुन्या नौकेच्या अवशेषांचा शोध
तुर्कियेत अलिकडेच एक शोध लागला असून यामुळे तज्ञांदरम्यान उत्साह निर्माण झाला आहे. नोआह आर्कच्या अवशेषांचा शोध लावल्याचा दावा संशोधकांनी केला आहे. प्रत्यक्षात तुर्कियेच्या डुरुपिनार फॉर्मेशनमध्ये एका नौकेच्या आकाराच्या ढिगाऱ्याचा शोध संशोधकांनी लावला आहे.
तुर्कियेच्या डुरुपिनारमध्ये जो नौकेच्या आकारातील ढिगारा मिळाला आहे, तो दीर्घकाळापासून नूहच्या बायबलच्या कहाणीशी संबंधित असल्याचे मानले जात आहे. सुमारे 5 हजार वर्षांपूर्वी एका भयावह पूरादरम्यान हा उंच भाग पाण्यात बुडाला होता असे मानले जातेय. या शोधाने संशोधकाच्या एका आंतरराष्ट्रीय टीमचे लक्ष वेधले आहे. 2021 पासून या संरचनेचे अध्ययन करण्यासाठी टीम एकत्र काम करत होती. परंतु सध्या या शोधाची तपासणी केली जात आहे.
अधिक डाटा मिळवत हा ढिगारा प्रत्यक्षात एक प्राचीन आणि महत्त्वपूर्ण ऐतिहासिक अवशेष समोर आणण्याची संधी असल्याचे टीमचे मानणे आहे. इस्तंबुल तांत्रिक विद्यापीठ, एग्री इब्राहिम सेसेन विद्यापीठ आणि अमेरिकेतील एंड्य्रूज विद्यापीठाच्या तज्ञांच्या सहकार्यातून माउंट अरारत आणि नूहच्या संदूक संशोधक पथकाच्या बॅनर अंतर्गत 2021 पासून काम केले जात आहे.
टीमने स्वत:च्या प्रयत्नांना डुरुपिनार संरचनेवर केंद्रीत केले आहे, जी लिमोनाइटने निर्माण झालेली 538 फूटांची भूवैज्ञानिक संरचना असून एग्रीच्या डोगुबायजिक जिल्ह्यात तुर्किये-इराण सीमेनजीक माउंट अरारत शिखरापासून सुमारे 30 किलोमीटर दक्षिणेस आहे.
डुरुपिनार संरचनेने स्वत:च्या जहाजासारखा आकार आणि आयामांमुळे संशोधकांना दीर्घकाळापासून आकर्षित केले आहे. टीमने स्थळावरून खडक अन् मातीचे सुमारे 30 नमुने मिळविले आहेत. विश्लेषणासाठी इस्तंबुल तांत्रिक विद्यापीठात पाठविण्यात आलेल्या या नमुन्यांमध्ये मातीसारखी सामग्री, सागरी भोजनाचे अवशेष ज्यात मोलस्क देखील सामील आहेत, त्यांच्या खुणा आढळून आल्या आहेत.
ही सामग्री 3500 ते 5000 वर्षे जुनी असल्याचे तज्ञांना आढळून आले. ही कालमर्यादा 5500-3000 ख्रिस्तपूर्वपर्यंत फैलावलेल्या ताम्रपाषाण काळाशी मिळतीजुळती आहे, पूराच्या युगाशी हा कालावधी जोडलेला आहे. प्रारंभिक निष्कर्षांनुसार या क्षेत्रात ताम्रपाषाण काळापासूनच मानवी हालचाली होत असल्याचे मानले जाते. मेसोपोटामिया क्षेत्राच्या स्वरुपात ओळखल्या जाणाऱ्या कुडी आणि अरारतमध्ये अधिक संशोधन करण्याचा निर्णय घेण्यात आल्याची माहिती एग्री इब्राहिम सेसेन विद्यापीठाचे व्हाइस रेक्टर आणि प्रमुख संशोधक डॉ. फारुक काया यांनी दिली आहे.









