वृत्तसंस्था/बेंगळूर
2024 च्या क्रिकेट हंगामातील होणाऱ्या दुलिप करंडक स्पर्धेतील पहिल्या फेरीतील सामन्याचे स्थलांतर करण्यात आले आहे. या स्पर्धेतील सलामीच्या दोन सामन्यांपैकी एक सामना आता अनंतपूर ऐवजी बेंगळूर येथे खेळविला जाणार आहे.
या स्पर्धेमध्ये भारतीय संघातील ज्येष्ठ आणि अनुभवी क्रिकेटपटू सहभागी होणार असून त्याला बुमराह आणि रविचंद्रन अश्विन यांचा अपवाद राहिल. त्याच प्रमाणे बीसीसीआयने भारतीय संघातील ज्येष्ठ खेळाडू रोहित शर्मा आणि विराट कोहली यांनाही सवलत दिली जाणार असल्याचे समजते. दुलिप करंडक क्रिकेट स्पर्धेला 5 सप्टेंबरपासून आंध्रप्रदेशमधील अनंतपूर येथील पहिल्या फेरीतील सामन्याने प्रारंभ करण्याचे निश्चित केले होते. पण आता ते सामने बेंगळूरच्या चिन्नास्वामी स्टेडीयमवर खेळविले जाणार आहे. भारत आणि बांगलादेश यांच्यात दोन सामन्यांची कसोटी मालिका भारतात सप्टेंबर महिन्यात आयोजित केली आहे. या मालिकेतील पहिला सामना 19 सप्टेंबरपासून चेन्नईत तर दुसरा सामना 27 सप्टेंबरपासून कानपूरमध्ये होणार आहे. या कसोटी मालिकेसाठी सरावाकरिता काही ज्येष्ठ खेळाडूंना सवलत दिली जाणार आहे. दरम्यान रवींद्र जडेजा, अक्षर पटेल, के. एल. राहुल, गिल, श्रेयस अय्यर, कुलदीप यादव हे दुलिप करंडक स्पर्धेत सहभागी होण्याची शक्यता वर्तविली जात आहे. त्याच प्रमाणे 15 ऑगस्टपासून सुरू होणाऱ्या बुची बाबु करंडक क्रिकेट स्पर्धेत सुर्यकुमार यादव आणि इशान किसन खेळण्यास उपलब्ध राहतील.









