प्रतिनिधी
बांदा
श्री दत्तकृपा सांस्कृतिक कला, क्रीडा व व्यायाम मंडळ इन्सुली यांच्या वतीने श्री दत्त जयंती निमित्त दत्त मंदिर इन्सुली येथे विविध धार्मिक व सांस्कृतिक कार्यक्रमाचे आयोजन करण्यात आले आहे. यानिमित्ताने सकाळी नऊ वाजता दत्त पादुका पूजन व अभिषेक, सकाळी दहा वाजता श्री सत्यनारायण महापूजा, आरती दुपारी महाप्रसाद, सायंकाळी सात वाजता महाआरती, सायंकाळी 7:30 वाजता भजनाचा कार्यक्रम व रात्री ठीक दहा वाजता जय हनुमान दशावतार नाट्य मंडळ आरोस दांडेली यांचा विंदय वासिनी विंदेश्वरी हा नाट्यप्रयोग होणार आहे. या उत्सवाचा लाभ घ्यावा असे आवाहन श्री दत्तकृपा सांस्कृतिक कला क्रीडा व व्यायाम मंडळ इन्सुलीच्या वतीने करण्यात आले आहे.









