दोडामार्ग तालुक्यातील तळकट कट्टा येथे विठ्ठल रखुमाई हरिनाम सप्ताह दिनांक 8 फेब्रुवारीला प्रारंभ होत असून 9 फेब्रुवारीला सप्ताहाची सांगता होणार आहे. यानिमित्ताने दोन दिवस धार्मिक कार्यक्रम होणार असून शनिवारी रात्री भजनाचा कार्यक्रम तर दुसऱ्या दिवशी दुपारी महाप्रसाद आणि तीर्थप्रसादाचे वाटप होणार आहे. हा हरिनाम सप्ताह 1932 पासून सातत्याने सुरू आहे. तरी भाविकांनी उपस्थित राहून कार्यक्रमाचा लाभ घ्यावा असे आवाहन विठ्ठल रखुमाई सप्ताह मंडळाचे सदस्य सर्वेश साळगावकर यांनी केले आहे.
Previous Articleमोबाईल स्टेट्सवरून जकातवाडीत पेटला वाद
Next Article खंडपीठासाठी 18 रोजी महारॅली









