मंत्री दीपक केसरकर यांच्या वाढदिवसाचे औचित्य
ओटवणे प्रतिनिधी
राज्याचे शालेय शिक्षण व मराठी भाषा मंत्री दीपक केसरकर यांच्या वाढदिवसानिमित्त त्यांचे कुलदैवत असलेल्या केसरी येथील करलाई मंदिरात अभिषेक, एकादशमी आदी धार्मिक कार्यक्रमांसह करलाईची ओटी भरण्यात आली. तर मंत्री दीपक केसरकर यांचे श्रध्दास्थान असलेल्या श्री स्वयंभू मंदिरातअभिषेक एकादशमी आदी धार्मिक कार्यक्रम झाले. सध्या विधिमंडळाचे अधिवेशन सुरू असल्यामुळे मंत्री दीपक केसरकर यांचे खंदे समर्थक असलेले केसरी गावचे माजी सरपंच तथा माजी पंचायत समिती सदस्य राघोजी उर्फ बाळा सावंत यांच्याहस्ते हे धार्मिक कार्यक्रम करण्यात आले.
श्री देवी करलाई हे दीपक केसरकर यांचे कुलदैवत आहे तर श्री स्वयंभू हे त्यांचे श्रद्धास्थान असल्यामुळे दरवर्षी ते आपल्या वाढदिवसानिमित्त या देवतांचे दर्शन घेऊन कृपाशीर्वाद घेतात. मात्र सध्या विधिमंडळाचे अधिवेशन सुरू असल्यामुळे आपल्या वाढदिनी ते आपल्या मतदार संघात उपस्थित राहू शकले नाही. त्यामुळे त्यांच्यावतीने राघोजी सावंत यांनी या दोन्ही देवतांकडे हे धार्मिक विधी केले. यावेळी केसरीचे गावपुरोहित आनंद सोमण, देवसु गावचे सामाजिक कार्यकर्ते आनंद सावंत आदी उपस्थित होते.









