किरकोळ महागाई जुलैमध्ये 3.5 टक्क्यांपर्यंत खाली : पाच वर्षांच्या नीचांकावर
वृत्तसंस्था/ नवी दिल्ली
सरकारने महागाईचे ताजे आकडे जाहीर केले आहेत. 12 जुलै रोजी जाहीर झालेल्या आकडेवारीनुसार, भारताचा किरकोळ चलनवाढीचा दर जुलैमध्ये 3.54 टक्क्मयांपर्यंत खाली आल्याचे स्पष्ट झाले आहे. हा दर पाच वर्षांच्या नीचांकी पातळीवर आल्याने सर्वसामान्यांना सुखद दिलासा मिळाला आहे. महागाईतील ही घसरण चांगल्या आधारभूत परिणामामुळे झाली आहे. जुलै 2023 मध्ये ग्राहक महागाई दर 7.44 टक्क्मयांवर पोहोचला होता. तर जून 2024 मध्ये हा दर 5.08 टक्के होता.
जुलैमध्ये ग्रामीण आणि शहरी भागातील महागाई दर अनुक्रमे 4.10 टक्के आणि 2.98 टक्के इतका नोंद झाला. ग्रामीण भागात जूनमध्ये तो 5.66 टक्के होता. तर शहरी भागातील महागाई 4.39 टक्के होती. प्रामुख्याने जूनमध्ये 9.36 टक्क्मयांच्या उच्च पातळीवर असलेला अन्नधान्य चलनवाढीचा दर जुलैमध्ये 5.42 टक्क्यांवर आल्याने हा दिलासा मिळाला आहे. भाज्यांच्या बाबतीतही मोठी घट होताना हा दर 29.32 टक्क्यांवरून 6.83 टक्क्यांपर्यंत घसरला आहे. डाळींचा महागाई दर महिन्याच्या आधारावर 14.77 टक्क्मयांवर घसरला. तर मांस आणि माशांच्या बाबतीत 5.97 वरून 5.39 टक्क्यांपर्यंत घसरण नोंद झाली. अंड्याच्या किमतीही 2.77 टक्क्मयांनी कमी झाल्या आहेत.
रिझर्व्ह बँकेच्या जुलै-सप्टेंबर 2024 साठी 4.4 टक्के महागाई दराच्या अंदाजाच्या तुलनेत महागाई दरातील घट आश्चर्यकारक असू शकते असे अर्थतज्ञांचे मत आहे. आरबीआयने आर्थिक वर्ष 2024-25 साठी एकूण चलनवाढीचा अंदाज 4.5 टक्के नोंदवला आहे. मात्र, चालू आर्थिक वर्षाच्या दुसऱ्या तिमाहीसाठी हा दर 3.8 टक्क्मयांवरून 4.4 टक्क्मयांपर्यंत वाढू शकतो, असेही म्हटले आहे.









