रांची :
मोदी आडनावासंबंधी केलेल्या टिप्पणीप्रकरणी काँग्रेस नेते राहुल गांधी यांना झारखंड उच्च न्यायालयाने मंगळवारी सुनावणीस प्रत्यक्ष उपस्थित राहण्यापासून सूट दिली आहे. यापूर्वी एमपी/एमएलए न्यायालयाने राहुल यांना सुनावणीस प्रत्यक्ष हजर राहण्याचा निर्देश दिला होता. याप्रकरणी आता पुढील सुनावणी 16 ऑगस्ट रोजी होणार आहे. मोदी आडनाव असलेले सर्व जण चोर असल्याची टिप्पणी राहुल यांनी 2019 च्या लोकसभा निवडणुकीच्या प्रचारादरम्यान केली होती. या विरोधात प्रदीप मोदी यांनी रांची येथील न्यायालयात याचिका दाखल केली होती.









