सर्वोच्च न्यायालयाने याचिकाकर्त्याला फटकारले
► वृत्तसंस्था/ नवी दिल्ली
महिलांबद्दलच्या वादग्रस्त विधानाप्रकरणी भाजप नेते कैलाश विजयवर्गीय यांच्यावर एफआयआरची मागणी करणारी याचिका शुक्रवारी सर्वोच्च न्यायालयाने फेटाळून लावली. तुमची तक्रार असती तर तुम्ही पोलीस किंवा कनिष्ठ न्यायालयात गेला असता, असे न्यायालयाने याचिकाकर्त्याला फटकारले. तसेच सर्वोच्च न्यायालय सुनावणी कशी करेल? अशी विचारणाही त्यांना केली.
विचित्र कपड्यांमुळे अनेक मुली आपल्याला शूर्पणखाप्रमाणे दिसतात, असे वक्तव्य भाजपचे राष्ट्रीय सरचिटणीस कैलाश विजयवर्गीय यांनी केले होते. त्यांच्या या वक्तव्यावऊन गदारोळ करताना काँग्रेससह अनेक पक्षांनी त्यांच्यावर टीका केली होती. त्याचदरम्यान विजयवर्गीय यांच्याविरोधात एफआयआर नोंदवण्याची मागणी करत याचिकाकर्त्याने सर्वोच्च न्यायालयात धाव घेतली होती.









