सर्वोच्च न्यायालयाकडून सशर्त जामीन
वृत्तसंस्था/ नवी दिल्ली
सर्वोच्च न्यायालयाने शिक्षक भरती घोटाळ्याप्रकरणी पश्चिम बंगालचे माजी मंत्री आणि तृणमूल काँग्रेसचे नेत पार्थ चटर्जी यांना सशर्त अंतरिम जामीन मंजूर केला आहे. पार्थ चटर्जी यांनाएक फेब्रुवारी रोजी मुक्त केले जाईल, असे न्यायालयाने म्हटले आहे. पार्थ चटर्जी यांना मुक्ततेनंतर कुठलेही सार्वजनिक पद ग्रहण करता येणार नाही. परंतु ते आमदार म्हणून कार्यरत राहू शकतात.
कनिष्ठ न्यायालयाने त्यांच्यावरीरलआरोप निश्चित करावेत आणि जानेवारीच्या दुसऱ्या आणि तिसऱ्या आठवड्यापर्यंत साक्षीदारांची चौकशी केली जावी. कुठल्याही संशयिताला अमर्याद काळासाठी तुरुंगात ठेवता येणार नाही. याचमुळे आरोपी आणि पीडितांच्या अधिकारांदम्यान संतुलन साधावे लागणार असल्याचे खंडपीठाने म्हटले आहे.
यापूर्वी सर्वोच्च न्यायालयाने 4 डिसेंबर रोजी पार्थ चटर्जी यांच्या जामीन याचिकेवर निर्णय राखून ठेवला होता. प्रथमदर्शनी पार्थ चटर्जी हे भ्रष्ट दिसून येत आहेत. त्यांच्या ठिकाणांवरून कोट्यावधी रुपये हस्तगत झाले आहेत अशी टिप्पणी मागील सुनावणीत न्यायालयाने केली होती.









