विशाखापट्टणम:
आंध्रप्रदेशचे माजी मुख्यमंत्री जगनमोहन रेड्डी यांच्या रॅलीदरम्यान एका कार्यकर्त्याचा मृत्यू झाला होता. याप्रकरणी उच्च न्यायालयाने रेड्डी यांना अंतरिम दिलासा दिला आहे. आंध्रप्रदेश उच्च न्यायालयाने सुनावणीदरम्यान उत्तरप्रदेशच्या कुंभमेळ्याच्या घटनेचा दाखला दिला. पूर्ण खबरदारी घेऊनही कुंभमध्ये दुर्घटना झाली होती असे न्यायालयाने म्हटले आहे.
18 जून रोजी जगनमोहन यांच्या ताफ्यातील एका वाहनाने 53 वर्षीय सी. सिंगय्या यांना चिरडले होते. या दुर्घटनेत सिंगय्या यांचा मृत्यू झाला होता. याप्रकरणी तपासात संबंधित कार जगनमोहन यांची असल्याचे स्पष्ट झाले होते. यानंतर पोलिसांनी कार जप्त करत जगनमोहन आणि पक्षाच्या अन्य सदस्यांच्या विरोधात एफआयआर नोंदविला होता.









