वृत्तसंस्था/नवी दिल्ली
दिल्लीतील एका न्यायालयाने गुरुवारी आप नेते सत्येंद्र जैन यांनी भाजप खासदार बांसुरी स्वराज यांच्याविरुद्ध दाखल केलेली फौजदारी मानहानीची तक्रार फेटाळून लावली. अतिरिक्त मुख्य न्यायदंडाधिकारी नेहा मित्तल यांनी या प्रकरणाची दखल घेण्यास नकार दिला. 5 ऑक्टोबर 2023 रोजी एका टीव्ही चॅनेलवरील मुलाखतीदरम्यान स्वराज यांनी त्यांच्याविरुद्ध खोट्या टिप्पण्या केल्याचा आरोप सत्येंद्र जैन यांनी केला होता. एका मुलाखतीत त्यांच्या घरातून 3 कोटी रुपये, 1.8 किलो सोने आणि 133 सोन्याची नाणी जप्त करण्यात आल्याचा खोटा दावा स्वराज यांनी केल्याचा आरोप होता.









