नवी दिल्ली :
मुकेश अंबानी यांच्या मालकीची रिलायन्स इंडस्ट्रिज 2030 पर्यंत नव्या ऊर्जा व्यवसायातून 15 अब्ज डॉलर्सची कमाई करू शकते, असे म्हटले जात आहे. नव्या भागीदारीच्या माध्यमातून नवे ऊर्जा प्रकल्प हाती घेण्यासाठी कंपनीची धडपड आगामी काळामध्ये अधिक दिसून येणार आहे. तंत्रज्ञान व इतर सहकार्य घेत रिलायन्स कंपनी नव्या ऊर्जा प्रकल्पांमध्ये अधिक लक्ष केंद्रीत करणार आहे. यातूनच 12 ते 15 अब्ज डॉलर्स उभारण्याचे प्रयत्न कंपनी करणार आहे.









