दुसऱ्या तिमाहीतील नफा जाहीर : महसुलातही 9 टक्क्यांची वाढ
वृत्तसंस्था/ मुंबई
अब्जाधिश उद्योगपती मुकेश अंबानी यांच्या रिलायन्स जिओने सप्टेंबर दुसऱ्या तिमाहीचा नफ्याचा निकाल जाहीर केला असून सदरच्या तिमाहीत कंपनीने 24 टक्के अधिक नफा कमावला असल्याचे समजते.
कंपनीच्या सूत्रांकडून मिळालेल्या माहितीनुसार वर्षाच्या आधारावरती नफ्यामध्ये 12 टक्के वाढ नोंदवली आहे. रिलायन्स जिओ इन्फोकॉम यांनी आर्थिक वर्ष 2024 च्या दुसऱ्या तिमाहीमध्ये 5,058 कोटी रुपयांचा निव्वळ नफा प्राप्त केला आहे. एक वर्षाच्या आधी समान अवधीमध्ये कंपनीने 4518 कोटी रुपयांचा निव्वळ नफा प्राप्त केला होता. तिमाही आधारावर पाहता रिलायन्स जिओने आर्थिक वर्ष 2024 च्या पहिल्या म्हणजेच जूनअखेरच्या तिमाहीत 4863 कोटी रुपयांचा निव्वळ नफा कमावला होता.
24 हजार कोटींचा महसूल
याच कालावधीत कंपनीने 9.9 टक्के वाढीसह 24,750 कोटी रुपयांचा महसूल प्राप्त केला आहे. मागच्या वर्षी या याच अवधीमध्ये कंपनीने 22,633 कोटी रुपयांचा महसूल प्राप्त केला होता. कंपनीच्या खर्चामध्ये 9 टक्के वाढ झाली असून तो 18,063 कोटी रुपयांवर राहिला होता.









