रिलायन्स 50 वर्ष जुना ब्रँड आणणार बाजारात
वृत्तसंस्था/ नवी दिल्ली
रिलायन्स कंझुमर प्रोडक्ट्स यांनी आपला 50 वर्ष जुना शीतपेय ब्रँड कॅम्पा कोला पुन्हा सादर केला आहे. 1990 च्या दशकाच्या उत्तरार्धात स्पर्धेमुळे बाजारातून बाहेर पडल्यानंतर त्याची विक्री कंपनी पुन्हा करणार आहे. आरसीपीएल ही अब्जाधीश उद्योगपती मुकेश अंबानी यांच्या नेतृत्वाखाली रिलायन्स इंडस्ट्रीजची उपकंपनी आहे.
कंपनीने एका निवेदनात म्हटले आहे की, कॅम्पा कोला, कॅम्पा लेमन आणि कॅम्पा ऑरेंज या तीन नवीन फ्लेवर्सचा प्र्रारंभीच्या टप्प्यात सॉफ्ट ड्रिंकमध्ये समावेश करण्यात येणार आहे. पहिल्यादा आंध्र प्रदेश आणि तेलंगणामध्ये उपलब्ध होणार असून नंतर टप्प्याटप्याने देशभरात सादर करण्यात येणार असल्याची माहिती आहे.
1970-80मधील लोकप्रिय ब्रँड
कॅम्पा कोला हा 1970 आणि 1980 च्या दशकामधील एक लोकप्रिय शीतपेय ब्रँड होता परंतु कोका कोला आणि पेप्सिकोच्या आगमनानंतर तो मागे पडला होता.









