श्रीलंकेतील कंपनीसोबत भागीदारी : पेय पदार्थांचा व्यवसाय विस्तारणार
वृत्तसंस्था/ मुंबई
रिलायन्स कंझ्युमर प्रॉडक्टस् लिमिटेड (आरसीपीएल)यांनी भारतामध्ये आपल्या बेवरेज उत्पादनांच्या व्यवसायाचा विस्तार करण्याची योजना बनवली आहे. यासाठी श्रीलंकेतील एलिफंट हाऊससोबत एक करारही केला असल्याची माहिती आहे.
रिलायन्स रिटेल वेंचर्स लिमिटेड यांच्या मालकी हक्काखाली कार्यरत असणाऱ्या आरसीपीएलने श्रीलंकेतील एलिफंट हाऊस यांच्यासोबत एक करार केला असून रिलायन्स कंझ्युमर भारतामध्ये एलिफंट हाऊस ब्रँडची पेय उत्पादने उत्पादित करण्यासोबतच विपणन व विक्री करण्यासाठी सज्ज होणार आहे. रिलायन्स आधीपासूनच कॅम्पा, सोस्यो आणि रासकीक यासारख्या बेवरेज उत्पादनांची विक्री करते. पेय उत्पादनांच्या विस्तारासाठी कंपनीने वरील करार केला असल्याची माहिती आहे.









