नदीकाठच्या गावांना सतर्कतेचा इशारा
सरवडे प्रतिनिधी
काळम्मावाडी येथील दूधगंगा धरण क्षेत्रात पावसाचा जोर कायम असून धरणाच्या पाणी पातळीत वाढ होत आहे. आज धरणाचे पाच दरवाजे उघडण्यात आले असून त्यातून ३५०० क्युसेक्स पाण्याचा विसर्ग सुरू आहे. नदीपात्रात पाण्याचा विसर्ग केल्याने नदीच्या पाणी पातळीत वाढ होणार आहे. नदीकाठच्या गावांना सतर्कतेचा इशारा देण्यात आला आहे.








