शिरोळ : प्रतिनिधी
शिरोळ पंचायत समितीच्या 16 मतदारसंघासाठीचे आरक्षण सोडत गुरुवारी काढण्यात आली. जिल्हा पुरवठा अधिकारी दत्तात्रय कवितके यांच्या अध्यक्षतेखाली शिरोळ तहसील कार्यालयाच्या प्रशासकीय कार्यालय येथे आरक्षण सोडत प्रक्रिया पार पडली. तहसीलदार डॉ. अपर्णा मोरे धुमाळ यांनी उपस्थितांचे स्वागत करून आरक्षण सोडत याबाबत माहिती दिली. ही आरक्षण सोडत लहान मुलांच्या हस्ते चिठ्ठ्या उचलून काढण्यात आल्या.
शिरोळ तालुका पंचायत समितीमध्ये 16 गण आरक्षणासाठी झालेली सोडत प्रक्रिया अशी,
या आरक्षण सोडतीमध्ये कोथळी, अर्जुनवाड, शिरढोण, नांदणी, चिपरी, यड्राव हे मतदार संघ सर्वसाधारण गटासाठी तर धरणगुत्ती, तेरवाड, हेरवाड आणि दतवाड हे मतदारसंघ सर्वसाधारण महिलाकरिता आरक्षित झाले आहेत. या आरक्षण सोडतीमध्ये काही पंचायत समितीच्या विद्यमान सदस्यांना फटका बसला आहे. त्यामुळे कही खुशी कही गम अशी परिस्थिती तालुक्यात झाली आहे.
शिरोळ तालुक्यातील लोकसंख्येचा आधार घेऊन सन 2002 पासून लागू झालेले आरक्षण व अनुसूचित जातीची लोकसंख्या ग्राह्य धरून प्रथम अनुसूचित जाती यासाठी मतदारसंघ आरक्षित करण्यात आले. त्यानंतर अनुसूचित जाती महिला याकरिता आरक्षण चिठ्ठीद्वारे काढण्यात आले.
शिरोळ पंचायत समितीचे मतदारसंघ निहाय आरक्षण पुढीलप्रमाणे
दानोळी- नागरिकांचा मागास प्रवर्ग,
कोथळी- सर्वसाधारण
उदगाव – अनुसूचित जाती महिला
अर्जुनवाड- सर्वसाधारण
गणेशवाडी – अनुसूचित जाती महिला
आलास- नागरिकांचा मागास प्रवर्ग महिला धरणगुत्ती- सर्वसाधारण महिला
नांदणी – अनुसूचित जाती
चिपरी- सर्वसाधारण
यड्राव – सर्वसाधारण
अब्दुललाट – नागरिकांचा मागास प्रवर्ग शिरढोण -सर्वसाधारण
अकिवाट – नागरिकांचा मागास प्रवर्ग महिला तेरवाड- सर्वसाधारण महिला
हेरवाड- सर्वसाधारण महिला
दत्तवाड- सर्वसाधारण महिला