6 महिन्यांपूर्वी झाला होता जीवघेणा हल्ला
वृत्तसंस्था/ लंडन
ब्रिटिश-भारतीय लेखक सलमान रश्दी यांच्यावर 6 महिन्यांपूर्वी न्यूयॉर्कमध्ये चाकूने हल्ला करण्यात आला होता. या हल्ल्यातून त्यांचा जीव वाचू शकला असला तरीही एक डोळा त्यांना गमवावा लागला होता. याचदरम्यान रश्दी यांनी स्वतःचे नवे पुस्तक ‘व्हिक्ट्री सिटी’चे प्रकाशन केले आहे. हे पुस्तक 14 व्या शतकातील एका महाकाव्यावर आधारित आहे. हे पुस्तक रश्दी यांनी हल्ल्यापूर्वी लिहिले होते. तसेच ही कादंबरी मूळ स्वरुपात संस्कृतमध्ये लिहिले गेलेल्या ऐतिहासिक महाकाव्याचा अनुवाद आहे.

रश्दी यांच्यावर न्यूयॉर्कमध्ये एका कार्यक्रमादरम्यान हादी मतरने चाकूने वार केले होते. या हल्ल्यामुळे रश्दी यांनी एक डोळा तसेच एक हात गमाविला होता. रश्दी यांच्या विरोधात इराणच्या सर्वोच्च नेत्याने फतवा जारी केला होता. रश्दींच्या एका पुस्तकामुळे वाद निर्माण झाला होता.









