वृत्तसंस्था / रिनेस (फ्रान्स)
फ्रेंच लीग फुटबॉल स्पर्धेत रेमीस संघाला सलग चौथ्या पराभवाला सामोरे जावे लागले. या स्पर्धेतील येथे खेळविण्यात आलेल्या लीग-1 मधील सामन्यात रिनेसने रेमीसचा 1-0 अशा गोल फरकाने निसटता पराभव केला.
या सामन्यातील पहिल्या 10 मिनिटांच्या कालावधीतच रेमीसच्या किप्रेला पंचांनी लाल कार्ड दाखविले. याच कालावधीत रिनेसने या सामन्यातील एकमेव निर्णायक गोल नोंदविला. पंचांनी रिनेसला पेनल्टी बहाल केली आणि अर्नोड कालिमुंडोने शानदार गोल नोंदविला. कालिमुंडोचा हा या स्पर्धेतील 11 वा गोल आहे. रेमीस संघाला गेल्या 12 सामन्यामध्ये एकही विजय नोंदविता आलेला नाही. फेब्रुवारी महिन्यात झालेले सर्व म्हणजे चारही सामने त्यांनी गमविले आहेत. स्पर्धेच्या गुणतक्त्यात रेनीस 11 व्या स्थानावर आहे.









