युवकाच्या आई-वडिलांवरही गुन्हा दाखल
सांगली प्रतिनिधी
गेल्या अडीच वर्षापासून लग्नाचे अमिष दाखवून परिचारिकेवर बलात्कार केल्याप्रकरणी युवकावर गुन्हा दाखल केला आहे. याप्रकरणी संशयित म्हणून नितीन शंकर हारगे वय 24 रा. सलगरे, ता. मिरज याच्यावर सांगली ग्रामीण पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल केला आहे. तर या युवकाच्या आई-वडिलांनीही या लग्नाला विरोध केल्याने त्यांच्याविरूध्दही गुन्हा दाखल केला आहे. सांगली ग्रामीण पोलीस याचा तपास करत आहेत.
सांगलीतील एका हॉस्पिटलमध्ये पारिचारिका म्हणून काम करणाऱ्या युवतीची त्याठिकाणी शिकावू एक्स रे टेक्निशयन असणाऱ्या नितीन हारगेची ओळख 2021 साली झाली यातून प्रेमसंबंध निर्माण झाले. त्यानंतर नितीनने लग्नाचे अमिष दाखवून या परिचारिकेवर बलात्कार केला. त्याच दरम्यान नितीन यांने या युवतीला घरी नेवून आई-वडिलांची ओळख करून दिली. पण नितीनच्या आईवडिलांनी तिला सून म्हणून स्वीकारण्यास नकार दिला आणि त्यातून मग नितीन यांनेही हिच्याशी संबंध तोडले. या युवतीची फसवणूक झाल्याचे निदर्शनास आल्यावर तिने याबाबत सांगली ग्रामीण पोलीसात नितीनच्याविरूध्द बलात्काराचा तर त्याच्या आई वडिलांविरूध्द धमकी दिल्याचा गुन्हा दाखल केला.