मनपाची नवीन ई गर्व्हनन्स सिस्टिममध्ये सुविधा : पुढील महिन्यांपासून ई गर्व्हनन्स सिस्टीम अॅक्टीव्ह : एका क्लिकवर नागरी सुविधा मिळणार
विनोद सावंत/कोल्हापूर
महापालिकेच्या नवीन ई गर्व्हनन्स सिस्टिमचे कामकाज पूर्ण झाले आहे. पुढील महिन्यांत नवीन सिस्टीम अॅक्टीव्ह होणार आहे. यामध्ये अद्ययावत वेबसाईट आणि मोबाईल अॅपची सुविधेचा समावेश आहे. यामुळे विवाह नोंदणीसाठी रांगेत उभे राहण्याची आवश्यकता लागणार नाही. घरी बसूनच नोंदणीसाठी अर्ज करता येणार आहे. तसेच प्रमाणपत्रही मिळू शकणार आहे. केवळ ‘थम’ करण्यासाठीच मनपा कार्यालयात जावे लागणार आहे. अशा प्रकारे मनपाशी संबंधित अनेक नागरी सुविधा आता एका क्लिकवर मिळणार आहेत.
मनपाची संगणकीय सिस्टीम कालबाहय़ झाली होती. जुन्या सॉफ्टवेअरमुळे प्रशासकीय कामकाज गतीने होत नव्हते. त्यामुळेच मनपाने ई-गव्हर्नन्स सिस्टिमचा ठेका दुसऱया कंपनीला दिला आहे. नवीन सिस्टीम अद्ययावत तंत्रज्ञानाची आहे. यामुळे नागरीकांना तक्रारीसाठी महापालिकेत येण्याची गरज नाही. ते आता मोबाईल अॅप आणि वेबसाईटवर तक्रार करू शकणार आहे. विशेष म्हणजे ही तक्रार थेट वरीष्ठ अधिकाऱ्यांपर्यंत जाणार आहे. त्यामुळे तक्रारीचे निरसण त्वरीत होणार आहे. तसेच तक्रारीची अर्ज नेमका कोणत्या विभागात आहे, याची माहितीही नागरिकांना मिळणार आहे. याच प्रमाणे विकास कामांच्या फाईलीची स्थिती समजणार आहे.
आग लागली, अॅपवर तक्रार
सध्या आग लागणे, भिंत कोसळणे अशी आपत्ती घडल्यास अग्निशमन दलाच्या फोनवर तक्रार करावी लागते. हा फोन बंद पडत असल्याचे अनेकवेळा घडले आहे. नवीन सिस्टीममध्ये मनपाच्या अॅपवर तक्रार करता येणार आहे.
झाडू कामगार, टिपरची माहिती एका क्लिकवर
आपल्या प्रभागात आज स्वच्छतेसाठी झाडू कामगार कोण असणार आहे. टिपर कोणता येणार आहे. याची माहितीही एका क्लिकवर मिळणार आहे. याचबरोबर टिपरमध्ये कचऱयाचे वजन कितीही हे मनपा प्रशासनाला समजणार आहे.
परवाना नुतनीकरणही करता येणार
सध्या व्यावसायिकांना ऑनलाईन परवाना घेता येतो. मात्र, परवाना नुतनीकरणासाठी महापालिकेत जावे लागते. मोबाईल अŸपमुळे नुतनीकरणही घरातून होणार आहे.
मनपाच्या वाहनांवर वॉच
महापालिका मालकीच्या वाहनांवर आता नवीन ई गर्व्हनन्स सिस्टीममुळे वाŸच राहणार आहे. एका वाहनावर देखभालीसाठी किती खर्च झाला. दिवसभरात किती डिझेल लागले याची माहिती मिळणार आहे. वाहनाचा नंबर टाकल्यानंतर आतापर्यंची सर्व माहिती उपलब्ध होणार आहे.
विधी विभाग अपडेट
मनपा संदर्भातील न्यायालयीन केसेसची माहिती संबंधित वकील, संबंधित मनपा विभाग प्रमुख यांना मिळणार आहे. आठ दिवस अगोदर संबंधितांना तारीखेबाबतचा संदेश दिला जाणार आहे.
नवीन सिस्टीमचा ठेका -मोनार्च टेक्नॉलॉजी पुणे
महापालिकेचा खर्च -7 कोटी 50 लाख
वर्कऑर्डर-ऑक्टोंबर 2020
सिस्टीम कामकाज पूर्ण- 25 एप्रिल 2022
देखभाल दुरस्तीची जबाबदारी -5 वर्ष
डेटा सेंटर-शिवाजी मार्केट
प्रशासकाचे आदेश मिळताच नवीन सिस्टीम अॅक्टीव्ह
ई गव्हर्नन्स सिस्टीमचे सर्व कामकाज पूर्ण झाले आहे. सिस्टीम कार्यन्वीत करण्याची परवानगी मिळावी, याबाबतचा पत्र प्रशासक डॉ. कादंबरी बलकवडे यांच्याकडे दिले आहे. त्यांनी मंजूरी देताच सिस्टमी कार्यन्वीत केली जाईल. नवीन सिस्टीम अद्ययावत तंत्रज्ञान असणारी आहे. यामध्ये मोबाईल अॅपने नागरीकांना मनपाच्या घर बसल्या सेवा देण्याचा प्रयत्न केला आहे. -यशपाल रजपूत, सिस्टिम मॅनेजर, महापालिका