कुंभारजुवे : चेहर्यावर दिलेले हास्य ही मानवतावादी सेवा करण्यासाठी दिलेले मोठे वरदान आहे. दुस्रयांसाठी काम करणे हाच प्रत्येकांच्या जीवनातील आनंदाचा क्षण असला पाहिजे आणि दुस्रयाच्या तोंडावर तुमच्या कृतीने हास्य येणे हीच तुमची मोठी श्रीमंती आहे. आयुष्य जगण्यांचा मूलमंत्र कोरोनाने शिकविला ही वस्तुस्थिती आहे. आणि प्रत्येकाला दररोज जीवन मिळते मात्र मृत्यू हा एकदाच मिळतो याचसाठी जीवनात प्रत्येक छोट्या छोट्या क्षणी तुम्ही दुस्रया च्या चेहर्यावर आनंदाचे जीवन देऊ शकता ते तुम्ही अवश्य कऊ शकता असे आपल्या खुमासदार शैलीत बोलताना प्रमुख पाहुणे म्हणून पुणे येथील प्रसिद्ध बिल्डर लायन जालन यांनी उदगार काढले. खोली येथे लायन्स क्लब ऑफ ओल्ड गोवा तपे आयोजित लायन्स रिजन मिट 2022-23च्या प्रसंगी लायन ध्दारका जालन स्वर्णम सभागृहात बोलत होते. याप्रसंगी व्यासपीठावर प्रमुख वत्ते म्हणून बंगलोर येथील लायन्स जी. श्रीनिवास, रीजन चेअरपर्सन लायन्स गजानन गोलतकर, व लायन्स अनिता गोलतकर,ऑर्गनाईसिंग समितीचे चेअरमन लायन्स सुनील मेवडा, सचिव लायन्स महादेव वेणेकर, झोन चेअरपर्सन लायन्स बालाजी कृष्णस्वामी, लायन्स क्लब ओल्ड गोवा चे अध्यक्ष डॅनियल कुरियन. व अन्य लायन्स क्लब चे अध्यक्ष उपस्थित होते.
प्रमुख पाहुणे प्रसिद्ध बिल्डर लायन्स ध्दारका जालन यांनी समई प्रज्वलित करून या कार्यक्रमाचे रितसर उदघाटन केले. मान्यवरांचे व उपस्थितांचे स्वागत समिती चेअरमन सुनील मेवडा यांनी केले. ओळख लायन्स डॅनियल कुरियन यांनी करून दिली. सेवा हे मनांपासूनचे कार्य आहे मदर तेरेसा यांनी सेवेचे मानवतावादी कार्य केले आहे. त्याची प्रेरणा घेऊन आम्ही कार्य केले पाहिजे. मला गेली 46 वर्षे लायन्स क्लब च्या माध्यमातून सेवा करण्याची संधी मिळत आहे हे मी माझे भाग्य समजतो. तुम्ही या समाजातल्या गरजुसाठी आपले योगदान द्या असे आवाहन प्रमुख वत्ते लायन्स ज्.ी श्रीनिवास यांनी केले. सर्व क्लब नी दखल घेण्यासारखे कार्य केले आहे. गरजु लोकांसाठी सेवा हे आमचे ब्रीदवाक्य आहे. ते सर्वानी अंगीकारले पाहिजे असे आवाहन रिजन चेअरमन लायन्स गजानन गोलतकर यांनी केले. याप्रसंगी प्रमुख पाहुणे प्रसिद्ध बिल्डर लायन ध्दारका जालन यांच्या हस्ते स्मरणिकेचे अनावरण करण्यात आले. याप्रसंगी लायन्स कृष्णा स्वामी यांचे समयोचित भाषण झाले. कार्यक्रमाचे सूत्रसंचालन मिथिला साखळकर, रिचर्ड पिंटो यांनी ओळख धर्मा चोडणकर व आभार लायन्स महादेव वेणेकर यांनी मानले.









