बेळगाव : के. रत्नाकर शेट्टी स्पोर्ट्स फौंडेशन आयोजित राहुल के. रत्नाकर शेट्टी चषक बाद पध्दतीच्या फुटबॉल स्पर्धेत रविवारी खेळविण्यात आलेल्या सामन्यातून रेग एफसी ए ने मजर युनायटेडचा, रेग बीके एमएसडीएफचा, सावकार एफसीने फँन्कोचा तर तिरंगाने सिटी स्पोर्ट्सचा पराभव करून पुढिल फेरीत प्रवेश केला. स्पोर्टिंग प्लॅनेट टर्फ फुटबॉल मैदानावर आयोजित स्पर्धेत रविवारी खेळविण्यात आलेल्या सामन्यात रेग एफसीने मजर युनायटेडचा टायब्रेकरचा 4-3 असा पराभव केला. या सामन्यात पहिल्या सत्रात दोन्ही संघानी गोल करण्यात अपयश आले त्यामुळे गोलफलक कोराच राहिला. दुसऱ्या सत्रात रेग व मजर युनायटेडच्या खेळाडूंनी गेंल करण्याच सोपी संधीवाया घालविण्याने निर्धारीत वेळेत दोन्ही संघाचा गोलफलक गोलशून्य बरोबरीत राहिल्याने पंचानी टायब्रेकर नियमाचा वापर केला. त्यात रेग एफसीने 5-4 असा पराभव केला. रेग तर्फे मयुर, कैफ, ओंमकार व वेदांत यांनी गोल केले. दुसऱ्या सामन्यात रेग एफसी बीने एमएसडीएफचा टायब्रेकर मध्ये 4-3 असा पराभव केला.
या सामन्यात पहिल्या सत्रात दोन्ही संघानी गोल करण्यात अपयश आले त्यामुळे गोल फलक कोराच राहिला. दुसऱ्या सत्रात रेग व एमएसडीएफच्या खेळाडूंनी गेंल करण्याच सोपी संधी वाया घालविण्याने निर्धारीत वेळेत दोन्ही संघाचा गोलफलक गोलशून्य बरोबरीत राहिल्याने पंचानी टायब्रेकर नियमाचा वापर केला. त्यामध्ये रेग बीने 4-3असा पराभव केला. रेग तर्फे नवाल, समर्थ, आरजॉन व शॉन यांनी गोल केले. तिसऱ्या सामन्यात सावकार एफसी निपाणीने फॅन्कोचा 2-0 असा पराभव केला. 22 व्या मिनिटाला निपाणीच्या करण मानेच्या पासवर जीत पुटाणकरने गोल करून पहिल्या सत्रात 1-0 अशी आघाडी मिळवून दिली. दुसऱ्या सत्रात 48 व्या मिनिटाला निपाणीच्या प्रशांत आजरेकरच्या पासवर शादाब खानने दुसरग गोल करून 2-0ची आघडी मिळवून दिली. चौथ्या सामन्यात तिरंगाने सिटी स्पोर्ट्सचा टाफब्रेकरमध्ये 4-3 असा पराभव केला. पहिल्या सत्रात 23 व्या मिनिटाला तिरंगाच्या विकी गॉटमने गोल करून 1-0 ची मिळवूत दिली. दुसऱ्या सत्रात 52 व्या मिनिटाला सिटी स्पोर्ट्सच्या एडिसनने गोल करून 1-1 अशी बरोबरीत सामन्यात रंगत निर्माण केले. निर्धारीत वेळेत दोन्ही संघाचा गोल फलक शुन्य बरोबरीत राहिल्याने पंचानी टायब्रेकर नियमाचा वापर केला. त्यात तिरंगाने 5-4 असा पराभव केला. तिरंगा तर्फे राहिल, अबूजर बिस्ती, अनल बिस्ती व विकी गॉटम यांनी गोल केले. तर सिटी तर्फे अमिन, शोहेब, रोहन यानी गोले.
सोमवारचे सामने: 1) रेग एफसी वि. बुफा यांच्यात दुपारी 3 वा. 2) फास्ट फॉरवर्ड वि. रेग बी यांच्यात सायंकाळी. 4.30 वा. 3) खानापूर वि. सावकार एफसी निपाणी यांच्यात सायं 6 वा.









