विविध सोसायट्यांच्या ठेवीदारांचे जिल्हाधिकाऱ्यांना निवेदन
बेळगाव ; सहकारी संस्थांमध्ये सर्वसामान्य जनतेने ठेव रक्कम ठेवली होती. मात्र ती रक्कम देण्यास टाळाटाळ केली आहे. जवळपास हजारो कोटी रुपये देणे बाकी असून ती रक्कम तातडीने दिली तरच आम्ही निवडणुकीत मतदान करू, अन्यथा त्यावर बहिष्कार घालू, असा इशारा भारतीय जागृत मतदारांनी जिल्हाधिकाऱ्यांकडे निवेदनाद्वारे दिला आहे. जिल्हा व राज्यातील सोळाशे संस्था आहेत. जवळपास 5 लाख ठेवीदार आहेत. त्यामधील अनेक ठेवीदारांची फसवणूक झाली आहे. त्यामुळे आम्ही अडचणीत आलो आहे. तेव्हा या सहकारी संस्थांकडून रक्कम तातडीने द्यावी, अन्यथा मतदानावर बहिष्कार घाल, असे या निवेदनात म्हटले आहे. जिल्ह्यातील लाखो ग्राहकांची या आर्थिक संस्थेने फसवणूक केली आहे. हजारो कोटी रुपये या सर्वांचे ठकविले आहेत. सर्वसामान्य जनता यामुळे अडचणीत आले आहे. विविध कामासाठी ही रक्कम ठेवली होती. मात्र ती वेळेत दिली गेली नाही. त्यामुळे आम्ही सारेच त्रासात आहे, याचा सारासार विचार करून आम्हाला ती रक्कम परत करावी, अशी मागणी ठेवीदारांनी केली. अॅड. एस. बी. खानगौडर यांच्या नेतृत्वाखाली हे निवेदन देण्यात आले. यावेळी ठेवीदार मोठ्या संख्येने उपस्थित होते.









