हिंडलगा येथे यंग बेळगाव फाऊंडेशनचा उपक्रम
बेळगाव : हिंडलगा कारागृहासमोरील दुभाजकानजीक अपघात घडत आहेत. रात्रीच्या वेळी वाहनचालकांना दुभाजकाचा अंदाज येत नसल्याने या ठिकाणी अनेक अपघात घडले आहेत. यंग बेळगाव फाऊंडेशनच्यावतीने या ठिकाणी अपघात टाळण्यासाठी रिफ्लेक्टर बसविण्यात आला. यामुळे वाहनचालकांना रात्रीच्या वेळी दुभाजकाचा अंदाज येऊ शकेल. हिंडलगा परिसरात अनेक पथदीप बंद आहेत. यामुळे रात्रीच्या वेळी बाहेरून येणाऱ्या वाहनचालकांना दुभाजक दृष्टीस पडत नव्हता. या समस्येवर तोडगा काढण्यासाठी यंग बेळगाव फाऊंडेशनने रिफ्लेक्टर बसविण्याचा निर्णय घेतला. सामाजिक कार्यकर्ते गंगाधर पाटील, अॅलन मोरे, अद्वैत चव्हाण-पाटील, ओमकार कांबळे, अमित महाराज, संजय कुंडेकर यासह इतर तरुणांनी पुढाकार घेऊन रिफ्लेक्टर बसविला.









