जिम टोथपासून होणार विभक्त
बिल लिटिल लाइज या सीरिजमधील अभिनेत्री रीज विदरस्पूनने विवाहाच्या 11 वर्षांनी पतीपासून विभक्त होण्याचा निर्णय घेतला आहे. अभिनेत्रीने सोशल मीडियावर यासंबंधी घोषणा केली आहे. विवाहाच्या 12 व्या ऍनिव्हर्सरीपूर्वी रीज आणि तिचा पती जिम टोथने विवाह संपुष्टात आणण्याचा निर्णय घेतला आहे.
आमच्याकडे सर्वकाही शेअर करण्यासाठी आहे, घटस्फोटाचा हा निर्णय अत्यंत खबरदारीने आणि विचारानिशी घेतला आहे. घटस्फोटाचा निर्णय अत्यंत अवघड होता. आम्ही अनेक वर्षे एकत्र काढली आहेत. परस्परांसोबत आनंदाचे क्षण घालविले आहेत. आमच्या मुलाच्या पालनपोषणावरूनही सहमती दर्शविली आहे. सध्या आमच्यासाठी आमचा मुलगाच अत्यंत महत्त्वाचा असल्याचे रिजने म्हटले आहे.
रीजला 10 वर्षांचा मुलगा आहे. घटस्फोटानंतरही रीज आणि जिमने मुलाचे पालनपोषण एकत्रित करण्याचा निर्णय घेतला आहे. घटस्फोटाचा विषय मुलापासून दूर ठेवण्याचा निर्णय त्यांनी घेतला आहे. 2010 मध्ये रीज विदरस्पून आणि जिम टोथने विवाह केला होता. दोघेही विभक्त होण्यामागील कारण अद्याप समोर आलेले नाही. रिज ही हॉलिवूडमधील आघाडीची अभिनेत्री आहे.









