कोल्हापूर :
सौदत्ती यात्रेसाठी कोल्हापुरातून 169 एसटी बस गेल्या आहेत. यामुळे कोल्हापुरातील एसटी सेवेवर काही अंशी परिणाम होत आहे. 70 मार्गावरील बस फेऱ्यात कपात करण्यात आल्या आहेत. यामुळे प्रवाशांना बसची प्रतिक्षा करावी लागली. कोल्हापूर विभागातील एसटी प्रशासनाच्या ताफ्यात 717 एसटी बस आहेत. यापैकी 169 एसटी सौदत्ती यात्रेसाठी गेल्या आहेत. यापैकी 60 एसटी बस सांगली, सातारा डेपोतून घेतल्या आहेत. तर 109 एसटी कोल्हापूर विभागातील आहेत. तीन दिवस या एसटी सौदत्तीवरच असणार आहेत. या दरम्यान, कोल्हापुरातील एसटी सेवेवर काही अंशी परिणाम होत आहे.
Previous Articleकारखानदारांना बजावल्या कराच्या नोटीसा
Next Article लालकृष्ण अडवाणी आयसीयूमध्ये दाखल








