वृत्तसंस्था /मुंबई
स्मार्ट फोन क्षेत्रातील कंपनी शाओमी शुक्रवारी 26 ऑगस्ट रोजी आपला नवा रेडमी नोट 11 एसई लाँच करणार असल्याची माहिती आहे. यासंबंधीची माहिती कंपनीने नुकतीच ट्वीटरवर दिली आहे.
शाओमीच्या अधिकृत सूत्रांनी दिलेल्या माहितीनुसार सदरचा नवा फोन हा रेडमी नोट 10 एस सारखाच असणार आहे. ऑगस्ट 31 तारखेपासून एमआय डॉट कॉम आणि फ्लिपकार्टवर विक्रीसाठी नवा स्मार्ट फोन उपलब्ध होणार असल्याचेही कंपनीने स्पष्ट केले आहे. सदरचा स्मार्ट फोन 6.43 इंच अमोलेड डिस्प्लेसह सादर करण्यात येणार असून पंचहोल डिस्प्ले डिझाईनने युक्त या फोनला क्वॉड रिअर कॅमेरा असणार आहे.
मीडिया टेक हेलियो जी 95 चिपसेट सोबत येणाऱया या फोनला 3.5 एमएम हेडफोन जॅक डय़ुअल स्पिकरसह असणार आहे. 64 मेगापिक्सलचा वाईड अँगल कॅमेरा तर 8 मेगापिक्सल अल्ट्रा वाईड अँगलचा कॅमेरा यात असेल. या फोनची किंमत 20 हजार रुपयांच्या घरात असेल, असेही सांगितले जात आहे.
वैशिष्टय़े
- 6.43 इंचाचा अमोलेड डिस्प्ले स्क्रीन
- 90 हर्टझ किंवा 120 हर्टझचा रिप्रेश रेट
- 13 मेगापिक्सलचा प्रंट कॅमेरा
- 5000 एमएएचची दमदार बॅटरी
- 6 जीबी रॅम व 64 जीबी, 8 जीबी रॅम व 128 जीबी स्टोअरेज









