नवी दिल्ली :
चीनमधील मोबाईल कंपनी शाओमी यांनी आपल्या नव्या स्मार्टफोन रेडमी 14 सी 5जी स्मार्टफोनच्या लाँचिंगची तारीख जाहीर केली आहे. सदरचा स्मार्टफोन 6 जानेवारी 2025 रोजी भारतीय बाजारात उतरवला जाणार असल्याचे सांगितले जात आहे.
रेडमी इंडिया यांनी या संदर्भातली घोषणा केली असून सदरचा स्मार्टफोन हा 5जी असणार आहे. या नव्या फोनमध्ये अनेक वैशिष्ट्यो समाविष्ट केली जाणार असल्याचे सांगितले जात आहे. कॉलकॉम स्नॅपड्रॅगन या चिप्ससह हा फोन येणार आहे. 6.88 इंचाचा डिस्प्ले असणार असून 5160 एमएएचची बॅटरी देखील दिली गेली आहे. चार्जिंगकरिता 18 डब्ल्यूचा वायर चार्जर दिला जाणार आहे.









