वृत्तसंस्था/ इमोला, इटली
रेड बुलच्या मॅक्स व्हर्स्टापेनने येथे झालेल्या एमिलिया रोमाग्ना ग्रां प्रि फॉर्म्युला वन शर्यतीचे जेतेपद पटकावले. या मोसमातील त्याचे हे दुसरे जेतेपद आहे. मॅक्लारेनच्या लँडो नोरिसने दुसरे तर मॅक्लारेनच्याच पियास्ट्रीने तिसरे स्थान मिळविले.
व्हर्स्टापेनने गेल्या महिन्यात जापनिज ग्रां प्रि शर्यत जिंकली होती. रेड बुलचा हा एकंदर 400 वा एफ वन विजय होता. फेरारीच्या लेविस हॅमिलटनने 12 व्या स्थानावरून चौथे स्थान मिळविले. विल्यम्सच्या अॅलेक्स अल्बनने पाचवे, फेरारीच्या चार्लस लेक्लर्कने सहावे, मर्सिडीजच्या जॉर्ज रसेलने सातवे, विल्यम्सच्या कार्लोस सेन्झ ज्युनियरने आठवे, रेसिंग बुल्सच्या इसाक हदजरने नववे आणि रेड बुलच्या युकी त्सुनोदाने दहावे स्थान मिळविले.









