भारतीय हवामान विभागाने (IMD) शुक्रवारी महाराष्ट्र आणि मध्यप्रदेश या राज्यांसाठी ‘रेड अलर्ट’ जारी केला असून येत्या तीन दिवसात अत्यंत मुसळधार पाऊस पडण्याचा अंदाज वर्तवला आहे. हवामान खात्याने आग्नेय मध्य प्रदेश आणि विदर्भात 15 सप्टेंबरला, उत्तर- मध्य महाराष्ट्रात 15 सप्टेंबरला आणि गुजरातमध्ये 16 ते17 सप्टेंबरपर्यंत मुसळधार पाऊस पडणार असल्याची शक्यता केल्या आहेत.
आपल्या ट्विटर हँडलवर पोस्ट करताना आयएमडीच्या अधिकाऱ्यांनी म्हटले आहे कि, “पश्चिम मध्य प्रदेश रेड अलर्टवर आहे कारण 15 ते 17 सप्टेंबर दरम्यान अत्यंत मुसळधार पावसासह (204.4 मिमी पेक्षा जास्त) मुसळधार पावसाची अपेक्षा आहे. तयार रहा आणि सुरक्षित रहा!” आयएमडीने सोशल मीडिया पोस्टमध्ये म्हटले आहे.
IMD ने उत्तराखंड, सौराष्ट्र आणि कच्छ, मध्य प्रदेश, कोकण, मराठवाडा, विदर्भ आणि गोव्यासाठी 115.6 ते 204.4 मिमी पाऊस पडण्याची शक्यता वर्तवून ऑरेंज अलर्ट देखील जारी केला आहे. वायव्य बंगालच्या उपसागरातून आणि लगतच्या उत्तर ओडिशा-पश्चिम बंगालच्या किनार्यावरून पुढे सरकलेले कमी दाबाचा पट्टा आता पूर्व मध्यप्रदेशात पसरले असून पुढील 3- 4 दिवसांत ते पश्चिम मध्यप्रदेश आणि गुजरातमध्ये सरकण्याची शक्यता आहे.








