उत्तर कोरियाने डागली 10 क्षेपणास्त्र
वृत्तसंस्था/ सोल
उत्तर कोरियाने पूर्व आणि पश्चिम किनाऱयावरून 10 हून अधिक क्षेपणास्त्रs डागली आहेत. वेगवेगळय़ा प्रकारची क्षेपणास्त्रs उत्तर कोरियाकडून डागण्यात आल्याची माहिती दक्षिण कोरियाच्या सैन्याकडून देण्यात आली आहे. एक क्षेपणास्त्र सागरी सीमेनजीक कोसळल्याने दक्षिण कोरियाने स्वतःच्या एका बेटावर हवाई हल्ल्याचा इशारा जारी केला आहे. तसेच दक्षिण कोरियापासून जपानपर्यंत रेड अलर्ट जारी करण्यात आला आहे.
या क्षेपणास्त्रांना डागण्यापूर्वी उत्तर कोरियाने दक्षिण कोरिया तसेच अमेरिकेच्या संयुक्त सैन्याभ्यासावरून टीका केली होती. हा युद्धाभ्यास म्हणजे संभाव्य आक्रमणाची तयारी असल्याचा आरोप उत्तर कोरियाने केला होता. अमेरिका आणि दक्षिण कोरियाने 200 हून अधिक लढाऊ विमानांद्वारे युद्धाभ्यास केला असून यात एफ-35 लढाऊ विमानाचा समावेश होता. उत्तर कोरियाने बुधवारी सकाळी वोनसानच्या पूर्व किनारी क्षेत्रातून क्षेपणास्त्रs डागली आहेत. एक क्षेपणास्त्र दक्षिण कोरियाच्या सागरी सीमेपासून 26 किलोमीटर अंतरावर कोसळले आहे. यामुळे उलेउंग बेटावर हवाई हल्ल्याचा अलर्ट जारी केला असल्याचे दक्षिण कोरियाच्या जॉइंट चीफ्स ऑफ स्टाफने सांगितले आहे. उत्तर कोरियाने चालू वर्षात स्वतःच्या शस्त्रास्त्रांच्या परीक्षणावर भर दिला आहे. याचमुळे अमेरिका तसेच दक्षिण कोरियानेही युद्धाभ्यासांचे प्रमाण वाढविले आहे.









