Kolhapur Rain Update : राज्यात पावसाचा जोर वाढला असला तरी कोल्हापूर जिल्ह्यात पावसाचा जोर कमी झाला आहे. पण मुसळधार पावसाचा इशारा कायम आहे. आज हवामान विभागाने कोल्हापूर जिल्ह्याला रेड अलर्ट, तर उद्या ऑरेंज अलर्ट दिला आहे. सध्या पंचगंगा नदीवरील राजाराम बांधाऱ्यांची पाणीपातळी 40 फूट 5 इंच आहे. तर इशारा पातळी 39 फुट व धोका पातळी 43 फुट आहे. जिल्ह्यातील 81 बंधारे पाण्याखाली आहेत.पंचगंगेने इशारा पातळी ओलांडली आहे. नदीकाठावरील गावांचे स्थलांतर केले जात आहे.दरम्यान पुण्यासह सातारा जिल्ह्याला आज आणि उद्या रेड अलर्ट देण्यात आला आहे.
आज सकाळपासून राधानगरी धरणाचे चार दरवाजे उघडले आहेत. कोल्हापूर शहरातील सर्व आणि जिल्ह्यातील पूर्वाधित गावातील शाळांना सुट्टी जाहीर करण्यात आली आहे.कर्नाटकातील अलमट्टी धरणातील पाण्याचा विसर्ग वाढवण्यात आला आहे. यामुळे सांगली आणि कोल्हापूर जिल्ह्याला दिलासा मिळाला आहे. पंचगंगा नदी धोका पातळी ओलांडू शकते यामुळे नागरिकांनी सतर्क रहावे, दारापर्यंत पाणी येऊ पर्यंत थांबू नका स्थलांतर करा असा सूचना जिल्हाधिकारी राहुल रेखावार यांनी दिल्या आहेत.









