सावंतवाडी प्रतिनिधी
सावंतवाडी तहसिलदार कार्यालयात झाली आरक्षण सोडत जाहीर
सावंतवाडी विधानसभा मतदारसंघातील सावंतवाडी ,दोडामार्ग ,वेंगुर्ले या तीन तालुक्यातील तलाठी कार्यालयातील कोतवाल या पदासाठी आरक्षण सोडत आज काढण्यात आली आहे. एकूण 25 तलाठी कार्यालयात कोतवाल पदासाठी हे आरक्षण काढण्यात आले आहे . आरक्षण सोडत सावंतवाडी तहसिलदार कार्यालय येथे प्रांताधिकारी प्रशांत पानवेकर यांच्या उपस्थितीत काढण्यात आली आहे. या आरक्षण सोडत मध्ये महिला कोतवाल आता रुजू होणार आहेत. त्यांच्यासाठी 30 टक्के आरक्षण काढण्यात आले आहे. यावेळी तहसिलदार श्रीधर पाटील ,तहसिलदार संकेत यमकर ,ओंकार ओतारी उपस्थित होते .मळगाव सांगेली, चौकुळ, माडखोल, तळवडे ,कुणकेरी, चराठा , सातार्डा इन्सुली, सावंतवाडी शहर, तळवणे ,डेगवे ,निगुडे, असनिये या चौदा गावात कोतवाल आरक्षण निश्चित करण्यात आले आहे. तर वेंगुर्ले येथे सहा गावे तर दोडामार्ग येथे पाच गावे कोतवाल आरक्षण निश्चित केले आहे. आता लवकरच कोतवालांच्या भरती होणार आहेत.