राष्ट्रवादी पवार गटाचे प्रदेशाध्यक्ष आमदार जयंत पाटील
केवळ प्रसिद्धीसाठी ज्येष्ठ नेते शरद पवार यांच्यावर विरोधकांकडून टिका केल्या जात असल्याचा आरोप
कोल्हापूर
एसटी प्रवासाची भरमसाठ भाडेवाढ करून सर्वसामान्यांच्या खिशाला कात्री लावली जात आहे. एकीकडे भरमसाठ योजना राबवायच्या व दुसरीकडे जनेतेच्या खिशातून पैसे वसुल करायचे, काम सध्याच्या महायुती सरकारकडून सुरू आहे. एसटीच्या भाडेवाढेतून अन्य योजनांच्या पैशांची वसुली केली जात असल्याचा आरोप राष्ट्रवादी शरदचंद्र पवार पक्षाचे प्रदेशाध्यक्ष आमदार जयंत पाटील यांनी केला.
शनिवारी सायंकाळी कोल्हापूर येथे झालेल्या पत्रकार परिषदेत ते बोलत होते. राष्ट्रवादीचे नेते खासदार शरद पवार यांच्यावर वारंवार होणाऱ्या आरोपाबाबत बोलताना प्रदेशाध्यक्ष पाटील म्हणाले, शरद पवार यांच्या केंद्रीय कृषीमंत्री पदाच्या कार्यकाळात कृषीचे हित जोपासत शेतकऱ्यांसाठी विविध योजना अंमलात आणल्या गेल्या. कर्जमाफीसह अन्य योजनांच्या माध्यमातून शेतकऱ्यांना न्याय दिला. परिणामी, त्या काळात देशात शेतकऱ्यांच्या आत्महत्येच्या प्रमाणात घट झाली. कृषी, सहकार, साखरउद्योग आदींसह सर्वच क्षेत्रातील शरद पवार यांचे काम अमुल्य आहे. त्यामुळेच स्वत: पंतप्रधान मोदी यांनी अनेकदा पवार यांच्या कामाची प्रशंसा केली आहे. पण तरीही विरोधकांकडून केवळ प्रसिद्धीसाठी राष्ट्रवादीचे नेते पवार यांच्यावर वारंवार टिका केली जात असल्याचे सांगत आमदार पाटील यांनी महायुतीच्या प्रमुख नेत्यांवर निशाना साधला.
राज्यात नाही तर देशात खासदार पवार यांनी काम केले आहे. कृषी मंत्री म्हणून अजूनही शरद पवार यांनाच ओळखले जाते. त्यांनी देशात 71 हजार कोटी रुपयांची कर्जमाफी केली. जरा माहिती घेऊन बोला असा टोला त्यांनी गृहमंत्री अमित शहा यांना लगावला. भाजपला इतका मोठा विजय मिळूनही शरद पवार यांची भीती वाटत आहे.
पालकमंत्री निवडीनंतर मंत्रीच रस्त्यावर उतरून आंदोलन करत आहेत. हे महाराष्ट्रात पहिल्यांदाच घडत आहे. सहपालकमंत्री पदच अस्तित्वात नसतानाही हे पद दिले जात आहे. महिलांना 50 टक्के सूट दिल्यानंतर एसटी बस फायद्यात आहे म्हंटले जात असताना भाडेवाढ कशासाठी? असा प्रश्न त्यांनी उपस्थित केला. निवडणुकीपुर्वी लाडकी बहीण योजना अंमलात आणली. आता निकष लावून योजनेतील अनेक महिलांचा लाभ काढुन घेतले जात असल्याचे सांगितले जात आहे. या योजनतून सरकारने माघार घेता कामा नये. दावोस मधुन 15 लाख कोटींची गुंतवणूक आणल्याचे सांगितले जात असेल तर मग बेरोजगारी का? असा प्रश्न त्यांनी उपस्थित केला. बदलापूर घटनेतील अक्षय शिंदे याचा एन्काऊंटर या घटनेमागील आरोपींना वाचविण्यासाठी केला आहे.
Trending
- Testing
- Test 5 Dec
- Test Post 12-11
- Satara : साताऱ्यात कंपनीच्या अन्यायाविरोधात भूमिपुत्रांचे जिल्हाधिकारी कार्यालयासमोर आंदोलन
- उद्या देवसू शेंडोबा माऊली वार्षिक जत्रोत्सव
- Satara Crime : ‘मी फरारी आहे’ म्हणत लल्लन जाधव टोळीचा उपद्रव; पोलिस ठाण्यात गुन्हा दाखल
- Miraj : मिरजेत शिक्षण संस्था चालकाला आठ लाखांचा गंडा
- आज सांगेली गिरीजानाथाचा वार्षिक जत्रोत्सव








