वारणानगर प्रतिनिधी
मराठा आरक्षणाच्या अनुषंगाने पन्हाळा तहसिल कार्यालयात विविध महसूली अभिलेखाची विशेष तपासणी सुरु आहे यामध्ये ११ हजार १५७ कुणबी नोंदी आढळल्याचे तहसिलदार माधवी शिंदे – जाधव यानी सांगितले. जन्म – मृत्यू नोंदणी अभिलेखात या नोंदी बुधवार दि. २२ नोव्हेंबर अखेर २८ हजार ५५७ तपासणीत आढळल्या आहेत. सन १९११ पासून १० लाख १२ हजार ६५३ सात बाराच्या नोंदी,१ लाख ४३ हजार ६९८ फेरफार च्या नोंदी, कडई पत्रकच्या १ लाख १३ हजार १८९ नोंदीचे अभिलेख तपासण्यात आले यामध्ये कोणत्याही कुणबी नोंदी आढळून आल्या नसल्याचे तहसिलदार माधवी शिंदे – जाधव यानी सांगितले.
कुणबी नोंदी तपासण्याचे विशेष कक्षा मार्फत काम सुरु आहे ज्या नोंदी मोडी लिपीत आहेत त्याचे दस्त तज्ञाकरवी तपासून निश्चित केले जात आहेत सर्वच नोंदी संगणकीय प्रणालीद्वारे अपडेट करण्यात येणार असून तालुक्यातील गावनिहाय कुणबी नोंदीचे संगणकीय अपडेट करण्यात येणार असल्याचे तहसिलदार माधवी शिंदे – जाधव यानी सांगितले.