सांगली :
शहरातील वाल्मिकी आवास येथे राहणाऱ्या रेकॉर्डवरील गुन्हेगाराने याच परिसरात राहणाऱ्या संतोष रामहरी बंडगर रा. वाल्मिकी आवास, जुना बुधगाव रोड सांगली याला कोयत्याचा धाक दाखवून लुटले आहे. याप्रकरणी रेकॉर्डवरील गुन्हेगार पवन धर्मेंद्र साळुंखे याच्याविरूध्द गुन्हा दाखल केला आहे.
याबाबत अधिक माहिती अशी की, 12 डिसेंबर रोजी सांयकाळी पाच वाजता. फिर्यादी संतोष बंडगर हे मित्राला भेटण्यासाठी जात असताना रेकॉर्डवरील गुन्हेगार पवन साळुंखे यांने त्यांना अडविले आणि मला दारू पिण्यासाठी पैसे पाहिजेत अशी मागणी केली.त्यावेळी बंडगर यांनी माझ्याकडे पैसे नाहीत असे सांगितले पण पवन साळुंखे यांने त्याच्याकडील कोयत्या बाहेर काढला आणि कोयत्याचा धाक दाखवून बंडगर यांच्या खिश्यातील 100 रूपये जबरदस्तीने काढून तो निघून गेला. त्यानंतर बंडगर यांनी सांगली शहर पोलीस ठाण्यात फिर्याद दिली त्यानंतरपोलीस ठाण्यात येवून त्याच्याविरूध्द गुन्हा दाखल केला आहे. सांगली शहर पोलीस याचा अधिक तपास करत आहेत.








