कोलकाता :
देशातील आघाडीवरची पोलाद उत्पादक कंपनी सेल अर्थात स्टील ऑथोरिटी ऑफ इंडिया लिमिटेडने 2022-23 मध्ये विक्रमी स्तरावर पोलादाचे उत्पादन घेतले असल्याची माहिती आहे. 31 मार्च 2023 ला संपलेल्या वर्षात कंपनीने 19.41 दशलक्ष टन इतक्या पोलादाचे (हॉट मेटल) उत्पादन घेतले आहे. या आधीच्या वर्षाच्या तुलनेत उत्पादनात 3 टक्के इतकी वाढ झाली आहे.








