हैदराबाद
2022 सालात पहिल्या तिमाहीमध्ये घर विक्रीमध्ये हैदराबाद शहराने मोठी बाजी मारली आहे. हैदराबाद शहरातील घरांची विक्री मागच्या तिमाहीच्या तुलनेमध्ये 199 टक्के अधिक राहिली आहे. 13 हजार 140 घरांची विक्री 2022 च्या पहिल्या तिमाहीमध्ये झाली आहे. ऍनारॉक या संस्थेने केलेल्या पाहणीत ही माहिती समोर आली आहे. कॅलेंडर वर्ष 2021 मध्ये शहरामध्ये एकूण 25 हजार 400 घरांची विक्री झाली आहे. 2020 च्या तुलनेने पाहता ही वाढ 197 टक्के अधिक आहे.